इरफान पठाण लवकरच लग्नाच्या बेडीत

June 30, 2009 1:23 PM0 commentsViews: 72

30 जूनप्रसिध्द किक्रेटपटू इरफान पठाण लवकरच शिवांगी देव या त्याच्या मैत्रिण सोबत विवाहबद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियात राहणारी शिवांगी एक चार्टर्ड अकाऊंटट असून लहान मुलांचे डान्स क्लासेसदेखील घेते. या दोघांची भेट 2003 मध्ये झाली. त्यावेळी इंडियन टीम कॅनबेरामध्ये सराव मॅच खेळत होती. तीन वर्षांपूर्वी इरफानने शिवांगीला लग्नासाठी विचारलं होतं. दोघांच्या घरच्यांनीही या निर्णयाला पंसती दिली असल्याचं इरफाननं सांगितलं आहे. इरफान पठाणच्या फॅन्ससाठी ही एक आनंदाची बातमी आहे. पण तरीही काहींचे हार्ट ब्रेक होतील हेही नक्कीच.

close