SRAसाठी जमिनी नाही दिल्या तर कायद्याने काढून घेणार-मुख्यमंत्री

December 1, 2014 10:55 PM0 commentsViews:

cm_sra01 डिसेंबर : मुंबईत घर म्हणजे दिवास्वप्नचं…पण आता मुंबईत घरांची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. एसआरए (झोपड्डपट्टी पूर्नविकास)साठी जमीन दिली नाही तर 5 मोठ्या जमीन मालकांकडून जमीन काढून घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनंतर पाच वर्षांनी या एसआरएच्या कार्यालयाला एखाद्या मुख्यमंत्र्यानी भेट दिली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यासाठी काही कडक पावलं उचलण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. 20 वर्षांपासून रखडलेल्या पालिकेच्या 117 आणि म्हाडाच्या 96 भूखंडांवर एसआरए प्रकल्प 3 वर्षांत मार्गी लावणार आणि धारावी पुनर्विकासात 300 चौ.फूट घर मोफत देणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यावर आमचा भर असेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.लोकांना परवडणारी घरं द्यायची असतील तर काही गोष्टी तातडीनं करणं गरजेचं आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी निर्णयांना धडाका सुरू केला.

एक नजर महत्वपुर्ण निर्णयांवर…

– SRAसाठी जमीन दिली नाही तर 5 मोठ्या जमीन मालकांकडून जमीन काढून घेणार
– 20 वर्षांपासून रखडलेल्या पालिकेच्या 117 आणि म्हाडाच्या 96 भूखंडांवर SRA प्रकल्प 3 वर्षांत मार्गी लावणार
– धारावी पुनर्विकासात 300 चौ.फूट घर मोफत, 100 चौ.फुटाचा बांधकाम खर्च लाभाथीर्ंनी द्यावा

या पाच ट्रस्टकडे मुंबईतील हजारो हेक्टर जमिनीची मालकी आहे. ज्यावर झोपड्या आहेत.

– दिनशॉ ट्रस्ट – गोरेगांव
– वाडिया ट्रस्ट- कुर्ला
– जिजीभॉय बेहरामजी ट्रस्ट – मालाड
व्ही. के. लाल ट्रस्ट – दहिसर
– मोहम्मद युसुफ खोत – भांडुप

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close