IPL स्पॉट फिक्सिंग : सुप्रीम कोर्टाने पुन्हा बीसीसीआयला फटकारले

December 1, 2014 11:01 PM0 commentsViews:

sc on bcci01 डिसेंबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय आणि श्रीनिवासन यांना फटकारलंय. आजच्या सुनावणीमध्ये आपल्यावर लागलेले सर्व आरोप खोटे असल्याचं श्रीनिवासन यांच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. पण कोर्टाने श्रीनिवासन यांना चांगलेच फैलावर घेतले.

गेल्या आठवड्यात बीसीसीआयच्या कारभारावर कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पण तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी मय्यप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे बोर्डाने कोणालाही पाठिशी घातलं नाहीये, असा युक्तिवाद आज बोर्डाच्या वकीलांनी केला. तर श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सातत्यानं अरुण जेटलींचं नाव संदर्भासाठी घेतल्यानं त्यांनाही कोर्टाने फटकारलंय. इतकंच नाही तर बीसीसीआयने त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे तपशील द्यावेत असे आदेशही कोर्टाने दिलेत. आयपीएलचा लिलाव, खेळाडूंची विक्री, प्रसारणाचे हक्क आणि तिकीटांची विक्री नेमकी कशी केली गेलीये याबाबत कोर्टाने बोर्डाकडून खुलासा मागितलाय. या प्रकरणी आता पुढची सुनावणी 8 डिसेंबरला होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close