हिंदुराष्ट्र संकल्पनेशी तडजोड होणार नाही -भागवत

December 2, 2014 9:14 AM0 commentsViews:

M_Id_405192_Mohan_Bhagwat02 डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही आपल्या हिंदुराष्ट्र या संकल्पनेशी तडजोड करणार नाही असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं. 2025 पर्यंत म्हणजे संघाच्या शंभर वर्षपुर्तीपर्यंत आपल्या स्वप्नातील बलशाली भारत तयार करू असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील संघाचे दुसरे सरसंघचालक गोवळकर गुरुजी म्हणजेच माधव सदाशीव गोवळकर यांच्या घराच्या नुतनीकरण आणि लोकापर्ण कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत आणि हरिद्वारचे आचार्य गोविंदगिरीजी महाराज उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close