वरळी-वांद्रे सी लिंकचं उद्घाटन : नावावरुन वादाच्या भोवर्‍यात

June 30, 2009 1:53 PM0 commentsViews: 1

30 जुलै, मुंबईवांद्रे-वरळी सी लिंकचं सोनियां गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सी लिंकला राजीव गांधींचं नाव देण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिवसेना- भाजपचा विरोध केला आहे. पुलाला मराठी माणसाचं नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. वरळी- वांद्रे सी लिंकचं मंगळवारी सोनिया गांधींच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, एसआसआरडीसीच्या चेअरमन विमल मुंदडा, छगन भुजबळ, विलासराव देशमुख , जयंत पाटील हे नेते हजर होते. उद्घाटनाच्या प्रत्यक्ष सोहळ्याला शरद पवार हजर नव्हते. पण त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी या पुलाला राजीव गांधींचं नाव देण्याची सूचना केली. राजीव गांधींचा जन्म मुंबईत झाल्यामुळे राजीव गांधी भूमिपुत्र आहेत, असंही शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या सूचनेला मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर सोनिया गांधींनीही या सूचनेबद्दल आभार मानले. पण या सूचनेला सेना- भाजप नेत्यांनी आक्षेप घेत मराठी व्यक्तीचं नाव देण्याचा आग्रह केलाय. सी लिंकला राजीव गांधींचं नाव देण्याचा निर्णय दुदैर्वी आहे, या पुलाला मराठी माणसाचं नाव द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी केली.

close