ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा काळाच्या पडद्याआड

December 2, 2014 11:07 AM0 commentsViews:

deven34202 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांचं आज निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. ते गेले काही दिवस हृदयरोगानं आणि किडनी विकारानं आजारी होते.

अंगूर, खट्टा मीठा, अंदाज अपना अपना या चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका निभावल्या. अंगूर या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली.

हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. आज दुपारी त्यांच्यावर येरवडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close