पुण्यातला गँगवॉरचा थरार कॅमेर्‍यात कैद

December 2, 2014 4:20 PM0 commentsViews:

pune gangwar_cctv302 डिसेंबर : गँगवॉर म्हटलं की, आपल्याल नव्वदच्या दशकातली मुंबई आठवते. पण आता गँगवॉर्सनी पुण्याला पछाडलंय. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीजवळ झालेल्या गँगवॉरचं सीसीटीव्ही फूटेज आयबीएन लोकमतच्या हाती लागलंय.

पुण्यात गॅगवार कशा पद्धतीने उफाळू लागलंय, हेच या व्हिडिओतून स्पष्ट होतंय. या गॅगवॉरमध्ये घायवळ टोळीचा अमोल बंधे या गुंडाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. तर संतोष कांबळे आणि लखन लोखंडे हे त्यांचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले होते. अमोल बंधे वैकूंठ स्मशानभूमी समोरून आपल्या साथीरादासह दुचाकीवरून जात असताना तिथे दबा धरून बसलेल्या गुंडानी त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. दुचाकी स्वार खाली पडल्यानंतर कारमध्ये दबा धरून बसलेल्या काही गुंडानी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार करून गोळीबार केला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close