वांद्रे-वरळी सी लिंक : स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा प्रकल्प

June 30, 2009 3:00 PM0 commentsViews: 14

वांद्रे- वरळी सी लिंकच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला डोळ्यांचं पारणं फेडणार्‍या लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या सी लिंक मध्ये एकूण आठ लेन आहेत. सध्या चार लेन्सवरच वाहतुकीला सुरुवात करण्यात येणार आहे. यावर्षाअखेर उरलेल्या चार लेन्सचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. वांद्रे-वरळी या प्रवासाला एरव्ही तीस ते चाळीस मिनिटं लागतात. पण या पुलामुळे हे अंतर फक्त दहा ते पंधरा मिनिटांत पार करता येईल,असा एमएसआरडीसी ने दावा केला आहे. तसंच यामुळे 23 सिग्नल्स टाळणं शक्य होणार असल्याने वाहतूकीची कोंडी कमी होईल असंही सांगितलं. सी लिंकचं वैशिष्ट्य वांद्रे-वरळी सी लिंक बघितल्यावर सॅनफ्रान्सिस्कोचा प्रसिध्द गोल्डन ग्रेट आठवतो. हे दोन्ही ब्रीज दिसायला सारखे असले तरी यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये फरक आहे. वांद्रे-वरळी सी लिंक हा केबल स्टे ब्रीज आहे तर गोल्डन ग्रेट ब्रीज हा सस्पेन्शन ब्रीज आहे.पण दोन्हींमध्ये मुख्य भर असतो तो केबल्सवर. या ब्रिजचे वैशिष्ट्यं म्हणजे या पुलामध्ये सगळ्यात जास्त महत्व केबलला आहे. कारण ब्रिजचं संपूर्ण वजन केबल्सनी तोलुन धरलयं, म्हणुन या ब्रिजला केबल स्टे ब्रिज म्हणतात. ही टेक्नॉलॉजी चीनमध्ये सर्वात जास्त वापरण्यात आली त्यामुळे या केबल्स बनविणार्‍या कंपन्या चीन मध्ये जास्त आहेत. म्हणून यासाठी लागणारे केबल खास ऑर्डर देऊन चीनमधून मागविण्यात आले. त्या प्रत्येक केबलचं वजन 900 टन आहे. या ब्रिजसाठी वापरण्यात आलेल्या केबल्सची लांबी पृथ्वीच्या परीघाइतकी आहे. सिंगल टॉवरला जोडण्यात आलेल्या केबल्सची लांबी 500 मीटर्स आहे तर ट्विन टॉवर्सना जोडलेल्या केबलची लांबी 350मीटर्स आहे. सी-लिंकसाठी या केबल्स खूप महत्वाच्या आहेत कारण आधारासोबतच या केबल्समुळे सी-लिंकला एक नयनरम्य रुपही मिळालयं.या ब्रीजसाठी तब्बल 1600 कोटी खर्च करण्यात आले आहेत. वाहनांसाठी टोलवांद्रे-वरळी सी लिंकच्या वापरासाठी टोल आकारण्यात येईल. प्रत्येक गाडीमागे 50 रुपये टोल आकारला जाणार आहे. कारसाठी 50 रुपये,मिनीबससाठी 75 रुपये, बस आणि ट्रकसाठी 100 रुपये इतका टोल असणार आहे. बेस्ट बससाठी प्रवाशामागे एक रुपया एवढा टोल आहे. या टोलआकारणीच्या विरोधात मुंबई युश असोसिएशनचे प्रदीप भवनानी यांनी याचिका दाखल केलीय. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. बाईक्सना मात्र सी-लिंकच्या वापरासाठी परवानगी नाही. हा टोल पुढची 30 वर्ष आकारला जाणार आहे. वरळी-वांद्रे सी लिंकचं उद्घाटन झाल्यानंतर पहिले पाच दिवस सर्वंाना टोल फ्रि असणार आहे.

close