ए.आर.अंतुलेंचा जीवनप्रवास…

December 2, 2014 5:23 PM1 commentViews:

02 डिसेंबर : धडाकेबाज निर्णय घेत बेधडक वक्तव्य करणारे बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्व…9 फेब्रुवारी 1929 ला रायगडमध्ये त्यांचा जन्म झाला. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा लक्षवेधी आहे.

antuleyआणीबाणीनंतर केंद्रात इंदिरा गांधींच सरकार पुन्हा आलं. राज्यातलं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेलं पुलोद सरकार बरखास्त झालं. नंतर 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होतील अशी अटकळ बांधली जात असताना दिल्लीतून बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचं नाव पुढं आलं आणि 9 जून 1980 ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अंतुलेंच्या रूपानं कोकणाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदं मिळालं.मुस्लीम समाजातून मुख्यमंत्रिपदावर आलेलेही ते पहिलेच नेते ठरले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांना अनेक धडाकेबाज निर्णय घेतले.

शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनच्या म्युझियममधून आणण्याची त्यांची घोषणा चांगलीच गाजली. त्यासाठी ते लंडनची वारीही करून आले. मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईचं नाईट लाईफ पाहण्यासाठी रात्री शहरात फेरफटका मारला आणि अनेकांचे धाबे त्यावेळी दणाणले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरच्या महाजन रिपोर्टचा पर्दाफाश करणारं `महाजन रिपोर्ट अनव्हर्ड` हे त्यांचं पुस्तक चांगलच गाजलं. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची मैत्री जमली. नंतर केंद्रात त्यांनी आरोग्यमंत्री आणि अल्पसंख्याक विभागाचं मंत्रिपदही भुषवलं

त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले पण ते कधीच डगमगले नाहीत. त्यांच्या `इंदिरा-प्रतिभा प्रतिष्ठान`ला मिळालेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर ते दोषमुक्त झाले. शेवटपर्यंत त्यांनी आपला लढावू बाणा आणि स्पष्टवक्तेपणा कधीही सोडला नाही. अखेर हे वादळ शांत झालं.

अंतुलेंनी घेतलेले काही महत्वाचे निर्णय

जिल्हा विभाजनाचा महत्वपूर्ण निर्णय बॅरिष्टर अंतुलेंनी घेतला, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि उस्मानाबादमधून लातूर
जिल्ह्याची निर्मिती अंतुलेंनी केली.
सामान्य माणसांठी अंतुलेंनी संजय गांधी आणि स्वावलंबन योजना आणली त्यानंतर कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी थकी त कर्ज माफ केलं त्यावरून मुख्यमंत्री विरूद्ध रिझर्व बँक असा वाद रंगला होता.
स्वातंत्र्य सैनिकांची त्यांनी राज्यात 800 स्मारंक उभारली, स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्यांनी भरीव मदतीचा कार्यक्रम राबवला
मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार त्यांनीच सुरू केला
नवी मुंबईतलं कोकण भवन त्यांनीच उभारलं
पोलिसांसाठी पूर्ण खाकी गणवेश त्यांच्याच काळात आला
पोलिसांसाठी आठवड्याचे तास आणि साप्ताहिक तास त्यांनीच नियमित केले
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरच्या महाजन रिपोर्टचा पर्दाफाश केला

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • kishore

    very strong man

close