एक ‘विनोदी’ तारा निखळला

December 2, 2014 5:36 PM0 commentsViews:

आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांनी आज पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. 78 वर्षांचे वर्मा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी विनोदी भूमिका साकारल्यात. ‘अंगूर’ या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका विशेष गाजली. ‘अंगूर’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘चोरी मेरा काम’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ठ हास्यकलाकार’ म्हणून तीन फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close