खासदार रेखांनी घेतलं गाव दत्तक

December 2, 2014 6:25 PM1 commentViews:

rekha402 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असलेल्या खासदार आदर्श ग्राम योजनेत आता अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार रेखा यांनी सोमवारी पनवेल मधील वाजे गाव दत्तक घेतलं. यावेळी गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा निश्चय त्यांनी केला.

पंतप्रधानांनी सुरू केलेल्या खासदार आदर्श ग्राम योजनेचं अनेक खासदारांनी स्वागत केले आहे. अनेक खासदार गावं दत्तकही घेत आहेत. या योजनेत खासदार अभिनेत्री रेखा यांनीही उत्साही सहभाग दाखवत पनवेलमधलं वाजे हे आदिवासी गाव दत्तक घेतलं आहे. पनवेल शहरात असलेल्या या वाजे गावात पाणी नाही, रस्ते नाहीत तसेच मूलभूत सोयी- सुविधाही नाहीत. गावातील हे चित्र बदलण्याचा आणि संपूर्ण गावाचा कायापालट करण्याचा निश्चय रेखा यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी पनवेलमधल्या या छोट्याशा गावाला भेट दिली आणि गाव दत्तक घेत असल्याचं जाहीर केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ramesh Patil

    Well Done Rather better than Sachin who had to go to AP to adopt village

close