राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नीला सत्यनारायण

July 2, 2009 12:38 PM0 commentsViews: 31

2 जुलैमाजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांची राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. भारतीय प्रशासकिय सेवेतील 1971च्या बॅचमधील अधिकारी असलेल्या नीला सत्यनारायण यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलंय. गेल्या फेब्रुवारी महिन्यात महसूल खात्याच्या प्रधान सचिव म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. केवळ सनदी अधिकारी म्हणून नाही तर सामाजिक कार्यातही त्यांनी स्वतःची ओळख तयार केली आहे. मनोरुग्ण आणि अपंग यांच्याबद्दल कळकळ असणार्‍या नीला यांनी लेखन, गायन आणि संगीत क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.

close