दुधाच्या भावात घसरणीचा निषेध, हजारो लीटर दूध ओतलं रस्त्यावर

December 2, 2014 7:15 PM0 commentsViews:

indapur_milk02 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या खरेदी दरात 28 रुपयांपासून 18 रुपयांपर्यंत घसरण झाल्यानं शेतकर्‍यांचं अर्थकारण बिघडलंय.

त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यानी सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. कार्यकर्त्यांनी हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतून दिलं.

शेतकर्‍यांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला असून येत्या चार दिवसांमध्ये बारामती आणि इंदापुरात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close