नागपुरात कोळसा व्यापार्‍यावर गोळीबार

December 2, 2014 7:58 PM0 commentsViews:

nagpur3402 डिसेंबर : पुण्यात गँगवॉरची घटना ताजी असतांना नागपूरमध्येही गोळीबाराची घटना घडलीये.धरमपेठ भागातील कॉफी हाऊस चौकात चंद्रपुरचे कोळसा व्यापारी सागिर सिद्दिकी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सिद्दिकी या हल्ल्यातून बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला ती जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे.

नागपूरच्या धरमपेठ भागातील कॉफी हाऊस चौकात चंद्रपुरचे कोळसा व्यापारी सागिर सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सिद्दिकी ऑडी गाडीने जात असतांना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि गाडी अनियंत्रित होऊन जवळच्या घरात घुसली. या घटनेत सिद्दिकी जखमी झाले असून त्यांना व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोळशाच्या वादातून हा हल्ला झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close