मावळमध्ये आढळलं खवले मांजर

December 2, 2014 8:30 PM0 commentsViews:

02 डिसेंबर : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भर लोकवस्तीत एक खवले मांजर आढळून आलंय. देहूरोड- विकासनगर इथल्या वस्तीत हे मांजर आढळलं.खवले मांजर शक्यतो मानवी वस्तीपासून दूर राहतं, तसंच ते डोंगराळ किंवा दाट जंगलात आढळतं. वन विभागाने या मांजराला लोणावळ्यातल्या जंगलात सोडून दिलंय. हे मांजर विकासनगर इथल्या देवी हाईट्सजवळ अथर्व इमारतीच्या भूमिगत गटारात शिरत असताना नागरिकांनी पाहिलं. त्यानंतर वाईल्ड वेलफेअर असोसिएशनच्या (WWA) स्वयंसेवकांनी खवल्या मांजराला सुखरूप पकडलं. हे मांजर पूर्ण वाढ झालेलं आहे. त्याचं वजन 10 ते 12 किलो आहे. तर त्याची लांबी साडेतीन ते चार फूट एवढी आहे. त्याची उंची पाऊण फूट आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close