मंत्रिमंडळाचा विस्तार 3 दिवसांनंतर -मुख्यमंत्री

December 2, 2014 8:37 PM0 commentsViews:

fadanvis4402 डिसेंबर : शिवसेनेशी सकारात्मक बोलणी झाली आहे. लवकरच शिवसेना सत्तेत सहभागी होईल.  माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही या अनेक दिवसांच्या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला. सेना सत्तेत सहभागी होणार, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. भाजप-आणि शिवसेनेतली युतीबाबतची चर्चा यशस्वी झालीये. शिवसेनेला 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सदस्य संख्येच्या आधारावर यापुढे जागावाटप होणार आहे. मुंबईत भाजप-शिवसेनेत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा केली. आणि त्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. दुखवटा संपल्यावरच मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close