फिल ह्युजेसला अखेरचा निरोप

December 3, 2014 1:12 PM0 commentsViews:

phillip03 डिसेंबर : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजेसला क्रिकेट जगतानं आज अंतिम निरोप दिला. त्याच्यावर ऑस्ट्रेलियातल्या त्याच्या मूळ गावी मॅक्सव्हिल या शहरामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला निरोप देण्यासाठी त्याचे सहकारी उपस्थित होते.

मायकल क्लार्क, ऍरन फिंच, मार्क टेलर, रिकी पाँटिंग, ऍडम गिलख्रिस्ट, स्टीव्ह वॉ, जस्टीन लँगर, सर रिचर्ड हेडली यांनी त्याला त्याच्या शेवटच्या प्रवासात सोबत केली. त्याशिवाय भारतीय टीमचे कॅप्टन विराट कोहली, प्रशिक्षक डंकन फ्लेचर आणि टीमचे संचालक रवी शास्त्रीही फिलच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.

फिलच्या शहरातल्या आणि क्रिकेट जगातल्या सुमारे 5000 लोक त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होते. डोक्याला बॉल लागल्यामुळे फिलचा मृत्यू झाला. अवघ्या 25 वर्षाच्या फिलच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वाला धक्का बसला होता. देशभरातील क्रिकेट प्रेमींनी फिलला श्रद्धांजली वाहिली आणि आज त्याला अखेरचा निरोप दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close