शरद पवार दिल्लीतील घरात पाय घसरून पडले, पायाला फ्रॅक्चर

December 3, 2014 1:20 PM0 commentsViews:

pawar_on_bjp_news03 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पायाला दुखापत झालीये. नवी दिल्लीतल्या 6 जनपथ या आपल्या निवासस्थानी पवार मंगळवारी रात्री पाय घसरल्यामुळे पडले. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पवारांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय.

नवी दिल्लीतील 6 जनपथवर निवासस्थानी काल रात्री पाय घसरल्यामुळे पडले पण त्यांना त्याचा फार त्रास झाला नाही. आज सकाळी उठल्यावर त्यांना त्रास होऊ लागला, आणि फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. पवार यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले. पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं कळताच पवारांचे पुतणे अजित पवार यांनी आपला मराठवाड्याचा दुष्काळी दौरा रद्द केला आणि ते मुंबईत पोहोचले. तसंच छगन भुजबळही ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close