पुन्हा एकदा विल्यम्स विरुध्द विल्यम्स

July 2, 2009 1:06 PM0 commentsViews: 3

2 जुलैमहिलांमधल्या टॉप चार सिडेड खेळाडूंनी विम्बल्डनमध्ये प्रवेश केला आहे. पण विम्बल्डनच्या फायनलची लढत जवळ जवळ निश्चित झाली आहे.व्हिनस आणि सेरेना आत्तापर्यंत एकही सेट न गमावता सेमी फायनलपर्यंत पोहोचल्या आहेत. त्या दोघींचा फॉर्म बघता पुन्हा एकदा विल्यम्स भगिनी एकमेकांसमोर येणार असंच वाटतंय.व्हिक्टोरिया अझारेंकाला सेरेना नामशेष करत असताना व्हिनस प्रेक्षकात बसून तिचा उत्साह वाढवत होती. लहान बहिणीला सेमी फायनलमध्ये धडक देताना पहायला संपूर्ण विल्यम कुटुंब हजर होतं. व्हिनस आणि सेरेना या दोघींनी मिळून 7 एकेरी विम्बल्डन टायटल्स आपल्या नावावर केल्यायत. आणि आता आठवं टायटल्स नजरेच्या टप्प्यात आहे. पण फायनलचा रस्ता इतका सोपा नाही. विम्बल्डनमध्ये सलग 19 मॅच जिंकण्याचा विक्रम कायम ठेवण्यासाठी व्हिनसला सेमीफायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन दिनारा साफिनाशी मुकाबला करायचा आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरच्या साफिनाकडे अंडरडॉग म्हणून पाहिलं जातयं. पण पाचवेळा विम्बल्डन जिंकणार्‍या व्हिनसची कामगिरीही दमदार होतेय. व्हिनस सावध प्रतिक्रिया देत असली तरी पुन्हा एकदा व्हिनस विरुध्द सेरेना फायनल होणार असंच चित्रं दिसतंय.

close