वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

December 3, 2014 2:03 PM0 commentsViews:

ias_officer03 डिसेंबर : महाराष्ट्र कँडर मधील वरिष्ठ आयएएस अधिकारी देबशिष चक्रवर्ती आणि उज्ज्वल उके यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हे अधिकारी काही वर्षांपूर्वी एसआरएमध्ये नियुक्त होते. एका विकासकाने खोटी कागदपत्र बनवून विकास करताना क्षेत्रफळ वाढवलं होतं. त्यासाठी या अधिकार्‍यांनी विकासकास मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

वांद्रे पूर्व येथे मोतीलाल नेहरु नगर वसाहत आहे.या जागेवर 2005-2006 सालात झोपडपट्टी पुर्नवसन योजना राबवण्यात येणार होती.
ही योजना एचडीआयएल बांधकाम कंपनी विकास करत होती. त्या ठिकाणी तक्रादाराचा व्यावसायिक गाळा होता. हा गाळा तोडण्यात
आला. त्यानंतर तक्रारदार हे पात्र असतानाही त्यांना एसआरएच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अपात्र ठरवलं होतं. या योजनेतील गैरप्रकाराची माहिती तक्रारदाराने मिळवली. त्यानंतर मुंबई सेशन कोर्टात तक्रार केली. यावेळी विशेष सेशन्स न्यायाधीश एस.व्ही. रणपिसे यांनी सीआरपीसी 156(3) या कलमानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक बिभागाने 89 क्रमांकाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या 13(1)ड त्याच प्रमाणे भा.द.विच्या 120-ब, 420, 166, 167, 409, 465, 468, 471, 472, 34 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या गुन्ह्यात एचडीआयएलचे अध्यक्ष राकेश वाधवान त्याच प्रमाणे त्यांचे 10 सहकारी, तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांना ही आरोपी करण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close