अनिल कुमार सिन्हा सीबीआयचे नवे संचालक

December 3, 2014 12:11 PM0 commentsViews:

anil_kumar_sinha03 डिसेंबर : अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. मंगळवारी रात्री सिन्हा यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सिन्हा 1979 च्या बॅचचे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. नियुक्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश आणि काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली.

माजी सीबीआय संचालक रणजित सिन्हा निवृत्त झाले आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मागील आठवड्यातचं सुप्रीम कोर्टाने सिन्हा यांना टू जी प्रकरणाच्या तपासापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते.

सिन्हा निवृत्त होणार असल्यामुळे त्यांची जागा कोण घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं अखेरीस मंगळवारी रात्री बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेले अनिल कुमार सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close