यंदा हापूसची युरोपवारी नक्की ?

December 3, 2014 2:41 PM0 commentsViews:

ge_europ_hapus_3403 डिसेंबर : युरोपकरांना पुन्हा एकदा हापूसची ओढ लागलीये. हापूस आंबा पुन्हा युरोपला जाण्याची शक्यता निर्माण झालीये. त्यामुळे कोकणातल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

युरोपियन युनियनने वांगी, कारली, अळू आणि पडवळ या भाजांवरची बंदी उठवण्याची शक्यता आहे. युरोपीयन युनियनच्या अधिकार्‍यांनी भारतात येऊन पाहणी केलीय. यासंबंधी लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. युरोपियन युनियनने मे महिन्यात आंब्यासह चार भाज्यांवर बंदी घातली होती. त्यामुळे 25 हजार टन आंबा युरोपला जाऊ शकला नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने युरोपियन युनियनला या संबंधी विनंतीही केली होती. मात्र, आंबा काही परदेशी जाऊ शकला नाही. आता बाजारात हापूस येण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच युरोपियन युनियनने संकेत दिल्यामुळे आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close