पोलीस असल्याचं सांगून शिक्षिकेवर बलात्कार

December 3, 2014 3:37 PM0 commentsViews:

Rape case203 डिसेंबर : एका 21 वर्षीय शिक्षिकेवर पाच गुंडांनी पोलीस असल्याच सांगून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

बलात्कार पीडित आपल्या प्रियकरासोबत स्वामिनारायण मंदिरातून दर्शन घेऊन जात असतांना पाच गुंडांनी त्यांना अडवले. आपण पोलीस असल्याचं या लोकांनी सांगून शिक्षिकेच्या मित्राला मारहाण करून या लोकांनी शिक्षिकेला जवळच्या निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. कळमना पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close