‘त्या’चा वार्षिक पगार तब्बल दीड कोटी !

December 3, 2014 5:18 PM0 commentsViews:

facebook_camp03 डिसेंबर : नोकरी…हा सर्वांच्या आयुष्यातला महत्वाचा प्रश्न…नोकरीसाठी सगळेच जण वणवण भटकले असतील पण जर नोकरी चालून तुमच्याकडे आली आणि ‘छप्पर फाडके’ असं दीड कोटींचं पॅकेजची ऑफर मिळाली तर काय होईल ?, नुसता विचार करू नका, अशी ऑफर खरोखरच एका भाग्यवान तरुणाला मिळाली आहे. आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्याला फेसबुकने तब्बल दीड कोटींचं वार्षिक पॅकेज दिलंय.

कॉलेजच्या विश्वात ‘कॅम्पस प्लेसमेंट’द्वारे नवख्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी सहज उपलब्ध होते. आतापर्यंत टाटा, नेस्को, मायक्रोसॉफ्ट, विप्रो, महिंद्रा अँड महिद्रा, भारती आदी कंपन्यांच्या प्लेसमेंटमुळे अनेकांची नोकरीची स्वप्न साकार झाली. आयआयटी खरगपूर इथंही असंच कॅम्पस प्लेसमेंट पार पडलं. विशेष म्हणजे या कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी जगभरातल्या 27 अशा तगड्या कंपन्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये फेसबुक आणि गुगलचाही समावेश होता. मग काय साहजिकच विद्यार्थांचं नशीब फुलणार हे साहजिकच होतं. तरुणाईच्या गळ्यातलं ताईत बनलेल्या ‘फेसबुक’ने एका विद्यार्थ्याला थोडे थोडके नाही तर तब्बल दीड कोटींचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. तसंच फेसबुकनेच मुंबईतील आयआयटीमध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थिनीला तब्बल 1.4 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज दिलंय. सर्वाधिक पॅकेज मिळवणार्‍या 3 जणांमध्ये मुंबईच्या या विद्यार्थिनीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांनी भारतातल्या 163 विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांची नावं गुलदस्त्याच ठेवण्यात आलीये.

पगारांची कोटी कोटी उड्डाणे!

– आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्याला फेसबुकने दिलं रु. 1.5 कोटींचं वार्षिक पॅकेज
– कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आतापर्यंत मिळालेलं सर्वांत मोठं पॅकेज
– आयआयटी मुंबईच्या विद्यार्थिनीला फेसबुकनं दिलं रु. 1.4 कोटींचं वार्षिक पॅकेज
– सर्वाधिक पॅकेज मिळवणार्‍या 3 जणांमध्ये मुंबईच्या विद्यार्थीनीचा समावेश
– विद्यार्थ्यांची नावं गोपनीय ठेवण्यात आली आहेत
– कॅम्पस  प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी जगभरातल्या 27 कंपन्यांनी लावली हजेरी
– 27 बड्या कंपन्यांनी भारतातल्या 163 विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या
– या वर्षी सोशल नेटवर्किंग कंपन्या मोठे पॅकेजेस देण्यात आघाडीवर

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close