मंत्रिमंडळाचा विस्तार 5 डिसेंबरला

December 3, 2014 5:50 PM0 commentsViews:

fadanvis_mantralaya03 डिसेंबर : शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. 5 डिसेंबर शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी भाजपचे 4 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.  यावेळी शिवसेनेचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दुखवटा संपल्यानंतर 3 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री स्पष्ट केलं होतं. त्यानुसार अखेर 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी भाजपचे 4 कॅबिनेट मंत्री शपथ घेणार आहे. भाजपचे आमदार गिरीश महाजन, गिरीश बापट आणि पांडुरंग फुंडकर किंवा चैनसुख संचेती मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर राज्यमंत्रिपदी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, राम शिंदे, सुभाष देशमुख, सुनील देशमुख, संजय केळकर, देवयानी फरांदे आणि संभाजी पाटील-निलंगेकर शपथ घेण्याची शक्यता आहे.

भाजपचे संभाव्य मंत्री ?

कॅबिनेट मंत्री

गिरीश महाजन
गिरीश बापट
पांडुरंग फुंडकर किंवा चैनसुख संचेती

राज्यमंत्री
आशिष शेलार
राम शिंदे
सुभाष देशमुख
जय कुमार रावल
संजय कुटे
चंद्रशेखर बावनकुळे
सुनील देशमुख
संजय केळकर
माधुरी मिसाळ / देवयानी फरांदे
सुधाकर भालेराव / संभाजी पाटील-निलंगेकर
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close