आले फ्लेमिंगो

December 3, 2014 6:17 PM0 commentsViews:

03 डिसेंबर : थंडीची चाहूल लागली की पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसराला आणि राज्यातील हौशी पर्यटकांना वेध लागतात ते परदेशी पाहुण्यांचे…दोन अडीच फुट उंची, पांढरा शुभ्र रंग, बाकदार शरीराच्या साथीनं होणारी डौलदार चाल असं या पाहुण्याचं वैशिष्ट्य… आणि सोबतीला उजनी जलाशयाचा हिरवागार परिसर..आता तुम्ही म्हणाल हा पाहुणा कोण…?? तर हा पाहुणा म्हणजे सातासमुद्रापलीकडून येणारा फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी..असेच हजारो पाहुणे सध्या उजनी जलाशयाच्या आश्रयाला आले आहेत. हे सर्व टिपण्यासाठी उजनी जलाशयाकडे हजारो पर्यटक आणि फोटोग्राफर धाव घेतायत. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close