राज्यात 1600 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आणण्याचं विलासराव देशमुखांचं आश्वासन

July 4, 2009 5:38 PM0 commentsViews: 3

4 जुलै महाराष्ट्रात 1600 मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याची तयारी भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच भेलनं दाखवलीय. राज्य सरकारने तयारी दाखवल्यास आठ दिवसांच्या आत सामंजस्य करार करू, असं आश्वासन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी दिलं आहे. महाराष्ट्रात सध्या मोठ्याप्रमाणावर विजेचा तुटवडा जाणवतोय. ग्रामीण भागात बारा ते सोळा तास तर शहरी भागात चार ते सहा तासाचं भारनियमन केलं जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर महत्वाचा ठरू शकतो.

close