विद्यार्थ्यांना डांबून ठेवणार्‍या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

December 3, 2014 8:23 PM0 commentsViews:

nsk_school4344403 डिसेंबर : फी वाढीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या नाशिकमधल्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या मुख्याध्यापिका कुसुम शेट्टींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिक्षण हक्क कायदा आणि बालकांचं शोषण प्रतिबंध कायदा या अंतर्गत नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली.

सेंट फ्रान्सिस शाळेनं गेल्या 3 वर्षात दुपटीने फी वाढ केली. त्याविरोधात पालकांनी वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या, आंदोलनं केली, तरीही शिक्षणाधिकार्‍यांनी त्याची दखल घेतली नव्हती. जुलैमध्ये पोलिसांतही त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी शाळेच्या बसची फी भरली नाही म्हणून ज्युनिअर आणि सिनिअर केजीच्या सुमारे 30 ते 40 विद्यार्थांना शाळेतच डांबुन ठेवण्यात आलं. शाळा सुटल्यानंतर जवळपास दोन तास या विद्यार्थांना डांबुन ठेवत त्यांना जेवण आणि पाणीही पिण्यास मज्जाव करणयात आला होता. फी भरली नाही तर विद्यार्थांना बसमध्ये पाठणार नाही त्यांना घ्यायला या असा दमच शाळेनं विद्यार्थांच्या पालकांना देत विद्यार्थांना वर्गात डांबुन ठेवलं होतं. अखेरीस पोलिसांनी चौकशी करून मुख्याध्यापिका कुसुम शेट्टी यांना अटक केलीये. फी वसुलीसाठी शाळेनं विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. शाळा व्यवस्थापनानं मात्र याचा इन्कार केलाय. मात्र, फी भरण्यासाठी शाळेकडून दबाव येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close