मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी 5 डिसेंबरला

December 3, 2014 8:51 PM0 commentsViews:

uddhav and fadanvis_new03 डिसेंबर : शिवसेना आणि भाजपचा संसार आता पुन्हा फुलणार हे स्पष्ट झालंय. येत्या 5 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सेना आणि भाजपचे मंत्री शपथ घेणार आहे. विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी 4 वाजता शपथविधी होणार आहे. पण शिवसेनेनं मात्र आपण सत्तेत सहभागी होणार की नाही याबद्दल अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने अखेर सेनेशी यशस्वी बोलणी करून सत्तेतचा नवा मार्ग मोकळा केला. माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा निर्णय घेतलाय. येत्या 5 डिसेंबरला विस्तार होणार आहे. यावेळी दुपारी विधानभवनाच्या प्रांगणात 4 वाजता भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भाजपचे 4 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. हे. भाजपचे आमदार गिरीश महाजन, गिरीश बापट आणि पांडुरंग फुंडकर किंवा चैनसुख संचेती मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर राज्यमंत्रिपदी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, राम शिंदे, सुभाष देशमुख, सुनील देशमुख, संजय केळकर, देवयानी फरांदे आणि संभाजी पाटील-निलंगेकर शपथ घेण्याची शक्यता आहे.

पण सेनेनं अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. पण सकारात्मक चर्चा सुरू झाल्यानं शिवसेनेला या मंत्रिमंडळात शिवसेनेला स्थान मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या चर्चेनंतर आजही भाजप आणि शिवसेनेत पुन्हा चर्चा झाली. सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी सह्याद्री अतिथीगृहात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण शिवसेनेनं आतापर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाहीय. शिवसेना उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळात समावेशासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

भाजपचे संभाव्य मंत्री ?

कॅबिनेट मंत्री

गिरीश महाजन
गिरीश बापट
पांडुरंग फुंडकर किंवा चैनसुख संचेती

राज्यमंत्री
आशिष शेलार
राम शिंदे
सुभाष देशमुख
जय कुमार रावल
संजय कुटे
चंद्रशेखर बावनकुळे
सुनील देशमुख
संजय केळकर
माधुरी मिसाळ / देवयानी फरांदे
सुधाकर भालेराव / संभाजी पाटील-निलंगेकर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close