‘त्या’ दिवशी सलमान नशेत होता, रक्तात अल्कोहोल प्रमाणापेक्षा जास्त आढळले

December 3, 2014 9:51 PM0 commentsViews:

64577hit-and-run-salman34603 डिसेंबर : 2002 मधल्या हिट अँड रन केसप्रकरणी अभिनेता सलमान खान अपघाताच्या दिवशी दारू प्यायलेला होता असं आता उघड झालंय. या प्रकरणाची आज(बुधवारी) कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सलमानच्या रक्तामध्ये अल्कोहोल प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याचं जे जे हस्पिटलचे लॅब असिस्टंट डी के बालशंकर यांनी आपल्या जबाबात सांगितलं. तसंच सलमानची गाडी चांगल्या स्थिती होती असा जबाब मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर यांनी कोर्टात सांगितलंय.

सलमान खानने 2002 साली बेदरकारपणे गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या निष्पाप लोकांना चिरडलं होतं. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले होते. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली. सलमानचा कबुली जबाब नोंदवण्यात आला. आपली गाडी खराब झाली होती, गाडीचा ब्रेक फेल झाला असा दावा सलमानने केला होता. पण घटनेच्या वेळी सलमानची कार चांगल्या स्थितीत होती असं मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर यांनी कोर्टात सांगितलं. तर सलमानच्या रक्तामध्ये अल्कोहोल प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याचं जे जे हस्पिटलचे लॅब असिस्टंट डी के बालशंकर यांनी आपल्या जबाबात सांगितलं. यापूर्वीच्या सुनावणीत दोघा साक्षीदारांनी सलमानला ओळखलं होतं. ज्या हॉटेलमधून सलमान पार्टी करून निघाला होता त्यावेळी सलमान नशेत होता असं हॉटेलच्या वेटरने अगोदरच सांगितलं होतं. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे. त्यावेळी सलमानला गैरहजर राहण्याची सूट देण्यात आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close