सेनेच्या सत्तेत सहभागामुळे अशी बदलतील समीकरणं

December 4, 2014 9:00 AM0 commentsViews:

shivsena uddhav04 डिसेंबर : राज्यात शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. जे विरोधक होते ते सत्तेत जाणार आहे आणि ज्यांनी पाठिंबा दिला ते विरोधी बाकावर जाणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये सर्व पक्षांच्या भूमिका बदललेल्या दिसतील.

अशी बदलतील समीकरणं

– भाजप सरकारचं विधानसभेत स्पष्ट बहुमत होणार
– शिवसेनेचं विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद जाणार
– काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच होणार
– शिवसेना विधानसभा उपाध्यक्षपदासाठी दावा करणार
– काँग्रेसचं विधानपरिषद सभापतीपद राष्ट्रवादीकडं जाणार
– विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अविश्वास प्रस्ताव आणू शकते
– राष्ट्रवादी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरसुद्धा दावा करणार
– विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं तरी भाजप सेना सरकारची विधानपरिषदेमध्ये कसोटी लागणार
– विधान परिषदेमध्ये विधेयक वेळेत मंजूर करुन घेण्यासाठी सरकारला राष्ट्रवादीशी तडजोड करावी लागेल

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close