युती सरकार आले हो !.; उद्या होणार शपथविधी

December 4, 2014 7:14 PM2 commentsViews:

sena_bjp_yuti4404 डिसेंबर : आमची युती ही विचारांवर आधारित होती, पण मध्यंतरी आम्ही वेगळे झालो होतो पण निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि जनसमर्थाचा आदर राखला गेला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र सरकार चालवण्याचा निर्णय घेतला अशी महाघोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्या शुक्रवारी भाजपचे 8 ते10 तर शिवसेनेचे 10 मंत्री शपथ घेतील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. तसंच महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तर महाराष्ट्राला सुखी, समुद्ध करण्यासाठी आणि राज्यातल्या जनतेच्या भावनेचा सन्मान राखला गेला जावा यासाठीच सत्तेत सहभागी झालो असं सेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं. मुंबईत मुख्यमंत्र्यांसह सेनेच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्तेत सहभागी होण्यावर शिक्कामोर्तब केलं.

गेल्या 25 वर्षांची युती तुटल्यानंतर आता पुन्हा एकदा सेना भाजपचा संसार फुलणार आहे. सत्तेत सहभागाबाबत चार दिवस चर्चेनंतर सेनेनं होकार दिला. आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सेनेचे नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती सरकारची घोषणा केली. सेनेसोबत गेल्या 25 वर्षांची युतीही विचारांवर आधारित युती होती. 25 वर्षांच्या काळात सेनेसोबत खूप चढ -उतार पाहिले आहेत. गेली 25 वर्ष सेनेसोबत आम्ही निवडणूक लढवली पण यंदा झालेल्या वादामुळे वेगळं व्हावं लागलं हा निर्णय अत्यंत दु:खद असाच होता. पण एकीकडे सेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तरीही महाराष्ट्राच्या जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डावलून आम्हालाच कौल दिला. जनतेनं दिलेला हा कौल याचा आदर राखला गेला पाहिजे. सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचीही सत्तेत एकत्र येण्याची इच्छा आहे. त्यामुळेच जनसमर्थाचा आदर राखला गेला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र सरकार चालवण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपचे 8 ते 10 मंत्री आणि शिवसेनेचे 10 मंत्री शपथ घेतील असं फडणवीस यांनी जाहीर केलं. सेनेनं एकत्रित येण्यासाठी धर्मेंद प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांनी यशस्वी चर्चा केली असंही फडणवीस यांनी सांगितलं. तसंच युती सरकार हे महायुती सरकार आहे. घटकपक्षांसोबत बोलणी सुरू आहे. त्यानुसार लवकरच खातेवाटप केलं जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याच वेळी त्यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद नसणार आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तर राज्यातल्या जनतेच्या भावनेचा सन्मान राखला गेला जावा आणि महाराष्ट्राला सुखी, समुद्ध करण्यासाठी सत्तेत सहभागाचा निर्णय घेतलाय असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.

शिवसेनेचे हे नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
कॅबिनेट
एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते, सुभाष देसाई, दिपक सावंत

राज्यमंत्री

दिपक सावंत, राजेश क्षिरसागर, विजय शिवतारे, रवींद्र वायकर आणि संजय राठोड

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • meghana wahokar

    Abhinandan….

  • Ravi Kesarkar

    मला वाटते कुणी काहीही म्हटले तरी भाजपा आणी राष्ट्रवादी ची जवळीक बहुतेक लोकांना आवडली नव्हती आणी भक्कम,टिकाऊ आणी मजबूत सरकार जर महाराष्ट्राला द्यायचे तर शिवसेने शिवाय पर्याय नव्हता आता या दोघांची उशिराने का होईना युती झाली हे बरेच झाले. दुष्काळात होरपळलेल्या महाराष्ट्रला आणी शेतकऱ्यांना प्रथम बाहेर आणायचा प्रयत्न करा जी कामे रखडलेली आहेत त्यांना मार्गी लावण्याचा प्रयत्न करा , “युती” सरकारने चांगले निर्णय घेतले तर लोक आपण होऊन पाठींबा देतील आणी चुकीचे घेतले तर लोक सरकारच्या चड्ड्या सुद्धा काढायला मागे पुढे पाहणार नाहीत, सत्तेचा माज महाराष्ट्राच्या मातीला चालत नाही भल्या भल्यांना माती चारली आहे. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देवू नका हे नेहमी डोक्यात ठेवा. आणी हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे लोकांना भ्रष्ट सरकार नको आहे,विकास करणारे हवे आहे आणी तुमच्या कडे आता पुढील पाच वर्ष आहेत तुम्ही विरोधात असताना जे घोटाळे बाहेर काढले आहेत त्यांचे पुढे काय करताय याकडे आमच्या सारख्या जन सामन्य लोकांचे लक्ष राहणार . असो
    अभिनंदन “युती” सरकारचे …

close