युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद नाही -मुख्यमंत्री

December 4, 2014 3:39 PM1 commentViews:

cm on depcm3404 डिसेंबर :अखेर आज भाजप आणि शिवसेना सरकारची महाघोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण युतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नसणार असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सेनेनं खास उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती पण आता उपमुख्यमंत्रिपदाची खुर्चीच नसणार आहे. त्यामुळे युतीच्या सरकारने यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची प्रथा मोडीत काढली आहे.

गेल्या आठवड्यभरापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेरीस आज शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती सरकारची घोषणा केली. सत्तेत सहभागाबद्दल सेनेला एकूण 12 मंत्रिपद मिळाली आहे. 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदाचा यात समावेश आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद नसणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष सेनेकडे गेलं. मागील चर्चेच्यावेळी सेनेनं उपमुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरली होती. एवढंच नाहीतर उपमुख्यमंत्रिपदासाठी अनिल देसाई यांचं नावंही सुचवण्यात आलं होतं. पण सन्मानाने सत्तेत सहभाग मिळू न शकल्याने सेनेनं स्वाभिमानी निर्णय घेत विरोधीबाकावर बसणं पसंत केलं होतं. पण आता दुसर्‍यांदा सेनेला सत्तेत सहभागाची समोरून चालू संधी आली असतांना सेनेनं उपमुख्यमंत्रिपदाला नकार दिला की भाजपने ते मान्य केलं नाही हा प्रश्न आता निर्माण झालंय. सेनेनं 12 मंत्रिपदावर समाधान मानून सत्तेत सहभागी होण्याचा हाच स्वाभिमानी निर्णय घेतला का अशी चर्चा होत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vijay patole

    PATIENCE IS THE REAL ART OF HOPING ! AND NOW THAT IS HOPING FOR THE WIDER INTERST OF THE PEOPLE TO WHOM WE ALL OWE A GREAT !!

close