विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार -तटकरे

December 4, 2014 4:31 PM0 commentsViews:

sunil tatkare pkg04 डिसेंबर : शिवसेना सत्तेत सहभागी झाली आता सुंठीवाचून खोकला गेला अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता राष्ट्रवादी विरोधीपक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही भाजपला बाहेर पाठिंबा दिला होता त्यामुळे आता विरोधीबाकावर बसण्यात काहीच गैर नाही असंही स्पष्ट केलं. तटकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

विधानसभा निकालाच्या दिवशी राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. पण राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपचीच नाचक्की झाली. अखेरीस भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा झिडकारून सेनेशी हातमिळवणी केलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती सरकारची घोषणा केल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं. अजित पवारांनीही राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचं सांगितलंय. शिवसेनेनं सत्तेत सहभागावर तटकरेंनी खिल्ली उडवली. सेना सत्तेत सहभागी झाली म्हणजे आता सुंठीवाचून खोकलाही गेलाय असा टोला तटकरेंनी लगावला. विशेष म्हणजे बुधवारीच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधीपक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close