वर्ल्ड कप टीममधून सेहवाग, भज्जी,आणि युवीला डच्चू

December 4, 2014 4:52 PM0 commentsViews:

yuvraj singh sehwag and harbhajan04 डिसेंबर :  2015 वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये होणार्‍या वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने भारतीय टीमच्या संभाव्य 30 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2011 वर्ल्ड कप विजयातील 5 महत्वाच्या सीनिअर खेळाडूंना यावेळी डच्चू दिला गेलाय. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि झहीर खान यांना या संभाव्य 30 जणांच्या टीममध्ये स्थान मिळू शकलं नाहीये.

2011 च्या वर्ल्ड कप विजयात युवराज सिंगनं सिंहाचा वाटा उचलला होता. तर सेहवाग आणि गंभीरच्या बॅटिंगच्या जोरावर आणि हरभजन आणि झहीर या सीनिअर खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचू शकली होती. पण आता या यंग टीम इंडियामध्ये सीनिअर्सना स्थान मिळू शकलं नाही. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर खराब फॉर्ममुळे मागील अनेक सीरिजमध्ये टीममध्ये सहभाग मिळू शकला नाही. तर हरभजन आणि झहीरच्या बाबतीतही तेच घडले. अखेरीस या खराब फॉर्मुळे पाचही खेळाडूंना
2015 वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यात आलंय.

या 5 सीनिअर खेळाडूंना मिळाला डच्चू

वीरेंद्र सेहवाग
गौतम गंभीर
युवराज सिंग
हरभजन सिंग
झहीर खान

ही आहे 30 खेळाडूंची संभाव्य टीम इंडिया

महेंद्र सिंग धोणी, (कॅप्टन),शिखर धवन,रोहित शर्मा,अजिंक्य रहाणे,रॉबीन उथप्पा, विराट कोहली,सुरेश रैना,अंबाती रायडू,केदार जाधव,
मनोज तिवारी,मनिष पांडे,वृद्धिमान सहा, संजू सॅमसन,आर. अश्विन, परवेझ रसूल, कर्न शर्मा, अमित मिश्रा,रवींद्र जडेजा,अक्षर पटेल
ईशांत शर्मा,भुवनेश्वर कुमार,मोहम्मद शमी, उमेश यादव,वरूण ऍरॉन,धवल कुलकर्णी स्टुअर्ट बिन्नी,मोहित शर्मा,अशोक दिंडा, कुलदीप यादव आणि मुरली विजय

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close