कोकणातही मुसळधार पाऊस

July 4, 2009 3:19 PM0 commentsViews: 2

4 जुलै कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला. गेल्या चोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 162 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर रत्नागिरी जिल्ह्यात 130 मिलीमीटर पाऊस झाला. मालवण वेंगुर्ले भागातील किनारपट्टीवरील लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोकणातही येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.कोकण रेल्वेमार्गावर दरडशनिवारी रात्री कोकण रेल्वे मार्गावर सुकवली इथे दरड कोसळल्यामुळे दिवाण खवटी स्टेशनवर दादर-पॅसेंजर थांबवण्यात आली.

close