चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जबर मारहाण

December 4, 2014 8:16 PM1 commentViews:

nashik_chetkin04 डिसेंबर : महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चाललीये. नाशिकमधल्या सटाणा तालुक्यात चेटकीण असल्याच्या आरोपावरुन एका वृद्ध महिलेला जबर मारहाण करण्यात आलीये. कमळाबाई अहिरे या महिलेला गावकर्‍यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि अटकही करण्यात आली.

कमळाबाई अहिरे आपल्या कुटुंबासह मुळाने या गावात राहतात. ‘तू चेटकीण आहेस, तू गावात जादूटोणा करतेस, तुझ्या जादूटोण्यामुळे
शेळ्या मरतात, तुझ्यामुळेच आमची सून नांदत नाही’ असे आरोप करत गावामधल्याच लोकांनी कमळाबाईंना मारहाण केलीये. कमळाबाईंच्या तक्रारीवरुन सटाणा पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • KIRAN VANJARE

    andhshardha ahe he sagli as konachya sangnyvarun jar jhal asta tar jag khup pudhe gele aste

close