शहीद जवानांचे युनिफॉर्म कचरा कुंडीत आढळले

December 4, 2014 8:03 PM0 commentsViews:

crpf342304 डिसेंबर : छत्तीसगडमध्ये रायपूर इथं नक्षलवाद्यांशी जीवाची बाजी लावून लढतांना वीरमरण आलेल्या शहिदांची थट्टा केल्याचा प्रकार घडलाय. शहीद झालेल्या जवानांचे युनिफार्म रायपूरच्या गर्व्हनमेंट कॉलेजजवळ कचर्‍याच्यात डब्यात सापडल्याची शर्मेची बाब उघड झालीये.

तीन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत सीआरपीएफ दलाचे 14 जवान शहीद झाले होते. 14 पैकी 12 जणांचा पार्थिव जवानांनी ताब्यात घेतल होते. शहीद जवानांचे मृतहेद या पोस्टमार्टम करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होतोय.ज्या ठिकाणी पोस्टमार्टेम झालं तिथं कुत्र्यांचाही मुक्त वावर होता. नियमाप्रमाणे शहीद जवानाचे युनिफॉर्म त्यांच्या नातेवाईकांना द्यावे लागतात. पण त्याऐवजी ते कचर्‍याच्या डब्यातच आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close