‘त्या’ तिघींनी आपल्याच अपहरणाचा केला होता बनाव

December 4, 2014 9:08 PM1 commentViews:

pune woman04 डिसेंबर : पुण्याजवळील हिंजवडी परिसरातून बेपत्ता झालेल्या त्या तीन महिलांचा शोध लागलाय. गेल्या 6 दिवसांपासून गायब असलेल्या या महिला स्वत:च्या इच्छेनं पळून गेल्या होत्या अशी बाब आता उघड झालीये. या तिन्ही महिलांना जळगावजवळच्या भुसावळमधून ताब्यात घेण्यात आलं असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलंय.

सहा दिवसांपूर्वी पुण्याजवळील हिंजवडी परिसरातून एकाच दिवशी तीन महिला बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. विद्या खाडे आपल्या दोन मैत्रिणी मंगला इंगळे, प्रतिभा हजारे यांच्यासह दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. या तिघी एका कारमध्ये बसल्या आणि त्या नंतर पुन्हा परत आल्याच नाही. शेवटचा फोन झाला तेव्हा घाबरून मदत मागत असल्याची माहिती तक्रारदार प्रकाश हजारे यांनी दिली. या महिला बेपत्ता झाल्या नसून त्यांचं कुणीतरी अपहरण केल्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली होती. पण आज या महिलांना जळगावच्या भुसावळमधून ताब्यात घेण्यात आलंय. या महिला बेपत्ता किंवा यांचं अपहरण झालं नव्हतं या महिलांनीच अपहरणाचं नाट्य रंगवलं होतं. घरातील आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्या नोकरीच्या शोधात घर सोडून गेल्याचं तपासातून पुढे आलंय. आता या महिलांना आपल्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • csg

    artik paristitila kantalun ghar sodl …pn navryala changli sath deun pn arthik paristiti sudharta ali asti yaannaa……kay mhanav ya tighinha

close