नातू कुटुंबियांची जमीन बळकावल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

July 6, 2009 12:55 PM0 commentsViews: 2

7 जुलै, पुणेपुण्यातील नातु कुटुंबीयांची जमीन बळकावल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना अटक केली आहे. तर फरार म्हणून घोषित असलेल्या साधना वर्तक हिने पुण्यामध्ये शरणागती पत्करली आहे. सोमवारी सकाळी शेरू कांबळे आणि एकनाथ सुर्वे यांना अटक करण्यात आली. याआधी रविवारी दीपक मानकरचा ड्रायव्हर कैलास कांबळी आणि आनंद साळुंखे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर शनिवारी पुण्याचा माजी नगरसेवक दत्ता सागरेला अटक करण्यात आली होतीे. याप्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी सुधीर कर्नाटकी याला येत्या एक-दोन दिवसात अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close