भाजपचे हे मंत्री घेणार शपथ !

December 4, 2014 11:07 PM2 commentsViews:

bjp_list23452304 डिसेंबर : महाराष्ट्रात दुसर्‍यांदा युतीचं सरकार येणार हे आता निश्चित झालंय. गेल्या अनेक दिवसांच्या चर्चेनंतर शिवसेना सत्तेत भाग घेणार याबद्दलची अधिकृत घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यात 5 कॅबिनेट, 7 राज्यमंत्री असतील. त्यापैकी 10 मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे. तर भाजपचे10 मंत्रीही शपथ घेणार आहेत. या दहा मंत्र्यांची यादी आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. भाजपचे 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री शपथ घेणार आहे. यामध्ये आमदार गिरीश बापट,गिरीश महाजन, बबन लोणीकर आणि चंद्रशेखर बावनकुळे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. विशेष म्हणजे विधानभवनाच्या प्रांगणातला पहिल्यांदाच शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

भाजपचे 10 मंत्री उद्या घेणार शपथ
- कॅबिनेट मंत्री
- चंद्रशेखर बावनकुळे – कामठी
- गिरीश महाजन – जामनेर
- गिरीश बापट – पुणे
- बबन लोणीकर – परतूर
- राजकुमार बडोले – अर्जुनी मोरगाव गोंदिया

- राज्यमंत्री
- विजय देशमुख – सोलापूर
- राम शिंदे – कर्जत जामखेड
- राजे अंबरीश महाराज – अहेरी, चंद्रपूर
- प्रवीण पोटे – विधान परिषद आमदार – अमरावती
- रणजित पाटील – विधान परिषद आमदार – अकोला

असा होणार आहे शपथविधी सोहळा

विधानभवनाच्या प्रांगणातला पहिलाच शपथविधी
- शुक्रवारी 4 वाजता रंगणार शपथविधी सोहळा
- भाजपचे 10 आणि शिवसेनेचे 10 असे 20 मंत्री घेणार शपथ
- 7 हजारांची आसनव्यवस्था
- शाही नसला तरी मोठा शपथविधी सोहळा
- सध्याचे मंत्री, दोन्ही सभागृहातील आमदार, मुंबईतले खासदार विशेष आमंत्रित
- केंद्रातले बडे नेते येण्याची शक्यता
- उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • dnyanu aldar

    Laj wataylapahije ya bramhanana sarwe mantri yachench

  • dnyanu aldar

    Bahujan samaj Java ho

close