आंधळे भक्त, एका बाबाचं पार्थिव 10 महिन्यांपासून फ्रिजरमध्ये !

December 4, 2014 10:13 PM0 commentsViews:

baba_ashutosh3404 डिसेंबर : बाब रामपालनंतर आता पंजाबमध्येही एका महाराजांवरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आशुतोष महाराजांचं पार्थिव गेले 10 महिने फ्रिजरमध्ये होतं. कोर्टाने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहे. पण बाबांच्या पार्थिवाचं जतन करण्याचा भक्तांचा अट्टाहास आहे.

जालंधरच्या दिव्यज्योती जागृती आश्रमाचे संस्थापक आशुतोष महाराज यांचं 10 महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. आशुतोष महाराज हे दिव्यज्योती जागृती आश्रमाचे संस्थापक होते. मात्र त्यांच्या भक्तांनी त्यांचं पार्थिव गेल्या 10 महिन्यांपासून फ्रिजरमध्ये जतन करून ठेवलंय. हे प्रकरण आता कोर्टात गेलंय आणि कोर्टाने त्यांचा 15 दिवसांमध्ये अंत्यस्कार करण्याचा आदेश दिला आहे. मात्र भक्तांनी अंत्यसंस्कार करण्याला ठाम नकार दिलाय. आता पोलीस आश्रमाच्या ट्रस्टींशी वाटाघाटी करत आहेत. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.त्यामुळे पोलीस आणि आशुतोष महाराजांच्या भक्तांमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close