बाळासाहेबांनी मृत्यूपत्रात 8 वेळा केले होते बदल !

December 5, 2014 12:52 PM0 commentsViews:

balasaheb_t05 डिसेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्राबाबत सुनावणीच्या वेळी एक महत्वाची माहीत कोर्टात समोर आली आहे. ती म्हणजे बाळासाहेब यांनी मृत्यू पत्रात आठ वेळा बदल केले होते. हे बदल 1997 ते 2011 या कालावधीत केले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्राबाबत त्यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्याबाबत मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका हा दाखल केली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध जयदेव ठाकरे असा हा खटला सध्या सुरू आहे.

गुरुवारी सुनावणीच्या वेळी जयदेव ठाकरे यांच्या वकिल सीमा सरनाईक यांनी बाळासाहेब यांचं मृत्यूपत्र बनवणारे अँडव्होकेट एफ डिसोझा यांची न्यायलयात काल साक्ष घेतली.

या साक्षीत डिसोझा यांनी बाळासाहेब यांनी मृत्यू पत्रात आठ वेळा बदल केले होते. हे बदल 1997 ते 2011 या कालावधीत केले आहेत. अशी माहिती दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close