काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा हैदोस, 10 जवान शहीद, 8 अतिरेकी ठार

December 5, 2014 3:39 PM0 commentsViews:

kashmir_attack05 डिसेंबर : जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या 10 तासांत तब्बल 3 अतिरेकी हल्ले झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या उरी भागात दहशतवाद्यांसोबत चकमकीत 7 जवान आणि 3 पोलीस शहीद झाले आहे. तर जवानांनी 6 अतिरेक्यांना कंठस्नान घातलंय. तर दुसरीकडे श्रीनगर आणि शोफियानमध्येही अतिरेक्यांनी हल्ला केलाय.

आज सकाळी महोरा भागातल्या लष्करी तळामध्ये अतिरेक्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठी चकमक उडाली. दुपारपर्यंत ही चकमक सुरू होती. जवान आणि अतिरेक्यांच्या चकमकीत 10 सुरक्षारक्षकांना आपले प्राण गमवावे लागले. आता ही चकमक थांबलीय. पण त्याचवेळी श्रीगगर आणि शोफियानमध्येही अतिरेक्यांनी हैदोस घातला.

श्रीनगरमध्ये लाल चौकाजवळच्या सौरा परिसरात दहशतवादी घुसल्याच्या माहितीवरून लष्करानं कारवाई केली. त्यात एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आलंय.

तिसरी घटना शोपियानमध्ये घडली. शोपियनच्या पोलीस स्टेशनवर अतिरोक्यांनी हल्ला चढवला. पोलिसांवर ग्रेनेडचा हल्ला केला. त्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका सुरू असतानाच अतिरेक्यांनी हैदोस घातलाय. अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता असं पोलिसांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close