एकनाथ शिंदेंनी दिला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

December 5, 2014 1:13 PM0 commentsViews:

 

shinde_resign05 डिसेंबर : आज युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. शिवसेनेचे 10 आणि भाजपचे 10 आमदार यावेळी शपथ घेणार आहेत. दुपारी 4 वाजता विधानभवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी विधान सचिवांकडे आपल्या विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा सोपवला आहे.

आज होणार्‍या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचं खातेवाटपाची यादी आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. सेनेचे नेते एकनाथ शिंदेंना एमएसआरडीसी तर रामदास कदमांना पर्यावरण खातं मिळण्याची शक्यता आहे. दिवाकर रावतेंना परिवहन, सुभाष देसाईंना उद्योग खातं मिळण्याची शक्यता आहे. तर दीपक सावंतांना आरोग्य खातं मिळू शकतं. पण शिवसेनेला फारशी महत्त्वाची खाती न मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अपमानाची वागणूक देणार्‍या भाजपसोबत न जाता आपण विरोधी पक्षात बसणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं. तेव्हा शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. पण शिवसेना सत्तेत सहभागी होणार अशी घोषणा झाल्यानंतर कुठेही आनंदोत्सव साजरा करण्यात येत नाहीये. दरम्यान, शिवसेना विधिमंडळ गटनेते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी खासदार अनिल देसाई यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

शिवसेनेचे हे नेते घेणार शपथ

कॅबिनेट –
एकनाथ शिंदे – MSRDC, रामदास कदम- पर्यावरण , दिवाकर रावते- परिवहन , सुभाष देसाई- उद्योग, दीपक सावंत- आरोग्य
 
राज्यमंत्री -
- दीपक केसरकर, राजेश क्षीरसागर, विजय शिवतारे, रवींद्र वायकर आणि संजय राठोड

भाजपचे हे मंत्री घेणार शपथ

 कॅबिनेट मंत्री
- चंद्रशेखर बावनकुळे-कामठी
- गिरीश महाजन-जामनेर
- गिरीश बापट-पुणे
- बबन लोणीकर-परतूर
- राजकुमार बडोले-अर्जुनी मोरगाव गोंदिया

राज्यमंत्री
- विजय देशमुख-सोलापूर
- राम शिंदे-कर्जत जामखेड
- राजे अमरिश अत्राम-अहेरी
- प्रवीण पोटे-विधान परिषद आमदार-अमरावती
- रणजित पाटील-विधान परिषद आमदार-अकोला
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close