राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची होणार चौकशी

December 5, 2014 12:22 PM0 commentsViews:

424ajit pawar and bank05 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अखेर चौकशीचा फास आवळण्यात आलाय. आजपासून या प्रकरणाची चौकशी होणार आहे. या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचीही आज चौकशी होणार आहे. त्यांच्यासोबत बँकेच्या 65 संचालकांची चौकशी होणार आहे.

या चौकशीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच्या संचालकांवर आरोप निश्चित करून त्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चौकशी कार्यालय असून शिवाशिराव पहिनकर हे चौकशी अधिकारी आहेत. या चौकशीसाठी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक,यशवंतराव गडाख, विजय वड्डेटीवार, दिलीपराव देशमुख,माणिकराव कोकाटे, पांडुरंग फुंडकर, रजनी पाटील, आनंदराव आडसूळ, दिलीप सोपल यांच्यासह काही बड्या नेत्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.दरम्यान, बँकेनं संचालकांना योग्य ती कागदपत्रं न दिल्यानं ही चौकशी लांबण्याची शक्यता आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close