रिलायन्स आणि पेमेक्स यांच्यात तेल उत्खननासाठी करार

December 5, 2014 1:57 PM0 commentsViews:

relince_405 डिसेंबर : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि मेक्सिकोची सरकारी पेट्रोलियम कंपनी पेमेक्स यांच्यात तेल  उत्खननासाठी करार करण्यात आलाय. खोल पाण्यामध्ये तेल आणि गॅस शोधण्याचं काम रिलायन्स आणि पेमेक्स करणार आहे.

या करारानुसार दोन्ही कंपन्या एकमेकांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय तेल बाजारातही नव्या संधीचा शोध घेणार आहेत. तसंच स्किल डेव्हलमेंटसाठीही एकमेकांना मदत करणार आहेत. भारतातल्या पूर्व किनार्‍यावर रिलायन्सला गॅस शोधण्यात मोठं यश मिळालंय. त्याचबरोबर तेल उत्खननातही रिलायन्सनं चांगली कामगिरी केलीय. पर्यावरण आणि सामाजिक उपक्रम राबविण्यातही दोन्ही कंपन्यां सहकार्य करणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close