डॉक्टरांचा हलगर्जीपणा, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 16 जणांना अंधत्व

December 5, 2014 6:04 PM0 commentsViews:

panjab_eye05 डिसेंबर : पंजाबमध्ये गुरदासपूरमध्ये नेत्रतपासणी शिबिरात करण्यात आलेल्या ऑपरेशननंतर 16 जणांना अंधत्व आल्याची धक्कादायक घटना घडलीये. सर्व रुग्णांना आता अमृतसरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

पंजाबमधल्या गुरदासपूरमध्ये एका सामाजिक संस्थेने मागच्या आठवड्यात आयोजित केलेल्या नेत्रतपासणी शिबिरात या सगळ्यांवर मोतीबिंदूसाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्याच महिन्यात छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये एका मेडिकल कॅम्पमध्ये करण्यात आलेल्या गर्भनियोजन शस्त्रक्रियांनंतर 14 महिलांचा मृत्यू झाला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close