‘चला मगर पाहायला’

December 5, 2014 6:21 PM0 commentsViews:

05 डिसेंबर : कोकणातील चिपळूण तालुक्यात डोंगराळ भागात असलेल्या मालदोली गावातील खाडीत मगरींचे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत गेले. यामुळेच मगरी पाहण्यासाठी या दुर्गम भागातील गावात पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. कोणत्याही मोसमात याठिकाणी मगरी पर्यटकांना पाहायला मिळत असल्यामुळे मालदोलीला मगरींचे गाव अशी ओळख मिळाली आहे. खाडीमध्येच छोटी छोटी बेटे आहेत. खाजन प्रकारातील झाडांचा किनारा आहे. यामुळेच मगरीना या बेटात सुरक्षितता मिळते आणि सभोवताली असणारा खाडी किनारा थोडा उघडा आहे. या भागावर सूर्याची किरणे थेट येत असल्यामुळे पाण्यात राहणार्‍या मगरीना पाण्याबाहेरही संचार करण्यास भूगोलिक परिस्थिती आहे. यामुळेच मगरीचे प्रस्थ वाढत आहे. मगरी पाहण्यासाठी खाडीत बोटींची सफर करावी लागते येथील ग्रामस्थ पर्यटकांना विविध मार्गाने मदत करता असतात. यातूनच येथील काही होडी मालकांना रोजगार मिळाला आहे. पर्यटक फिरण्यासाठी मगरींच्या सफारी करिता होडी भाड्याने घेतात अप्रत्यक्ष काही प्रमाणात यामुळे रोजगार मिळाला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close