शिवसेनाप्रमुखांवर लीलावती हॉस्पीटलमध्ये अँजिओप्लास्टी

July 7, 2009 12:43 PM0 commentsViews: 62

7 जुलै शिवसेनाप्रमुखांवर लीलावती हॉस्पीटलमध्ये अँजिओप्लास्टी व्यवस्थित पार पडली आहे. त्यांची ऍन्जिओग्राफी झाल्यानंतर त्यातले रिपोर्टस पाहून डॉक्टर्स आणि कार्डियाक सर्जननी ऍन्जिओप्लास्टीचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे अमेरिकेहून परतलेत. बाळासाहेब ठाकरेंना काल लीलावती हॉस्पीटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं, त्यावेळी हे रूटीन चेकअप असल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. मात्र नंतर त्यंाची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेबांवर याआधी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळंच हार्टमधले ब्लॉकेजेस आणि आधी झालेली बायपास यांचा विचार करून ऍन्जिओप्लास्टीचा निर्णय घेण्यात आला.

close